गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्याने भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत नाचत आपला आंनद व्यक्त केला. मान्यवरांच्या हस्ते साखर पेढे वाटण्यात आले. भाजपचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देण्यात आल्या.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गुजरात विधानसभा निवडणूक भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगा झाली. मात्र, निकालात ही निवडणूक एकतर्फी झाल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण ताकद लावून झोकून देणाऱ्या आपला एक अंकी आमदारांसह केवळ खातं खोलता आलं आहे. काँग्रेसच्या जागांमध्येही मोठी घट झालीय आणि भाजपाला १५६ जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला आहे.