बेळगावसह इतर मराठी भाषक भाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ रविवारी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात येत आहे. १ नोव्हेंबर १९५६ या दिवशी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊन बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषक भाग व ८१४ गावे कर्नाटक घुसडण्यात आली. तेव्हापासून बेळगाव परिसरातील या भागात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. निपाणी येथे बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. १९५६ पासून मराठी भाषकांवर कर्नाटकात राहण्याची सक्ती करण्यात येत आहे. तेव्हापासून या भागातील मराठी भाषक जनता महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. बेळगाव, बिदर, भालकी आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत निपाणीवासियांनी आज काळा दिवस पाळला.