घराला लागलेल्या आगीत बहीण व लहान मुलांना वाचवण्याचे प्रयत्न करणार्‍या तरुणाचा घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जागीच मृत्यू  झाल्याची घटना घडली. पिंपरवाडा (ता.धारुर) येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

पिंपरवाडा येथून अर्धा किमी अंतरावर उत्तरेस श्रीहरी कारभारी तिडके व रामकिसन कारभारी तिडके यांचे शेतात पत्र्याचे शेड व गोठा आहे. दुपारी गोठ्यास अचानक आग लागली. गोठ्यातील बहीण व लहान मुलांना बाहेर काढून आग विझवण्यासाठी श्रीहरी तिडके यांचा मुलगा रवी तिडके (वय २१) हा जवळील टाकीतील पाणी घेऊन आग विझवत असताना अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात टाकीचा पत्रा मानेला लागल्यामुळे गंभीर जखमी होऊन रवी श्रीहरी तिडके याचा जागीच मृत्यू झाला.

DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान धारूर व केजच्या अग्निशमन बंब पाचारण करून आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत पत्राच्या शेडचे घर पुर्ण जळून खाक झाले होते.