लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : एका तक्रारी अर्जानुसार कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी पाच लाख रूपयांची लाच मागून त्यापैकी तीन लाख रूपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी शहरातील एका सहायक पुलीस फौजदाराविरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

संजय मनोहर मोरे (वय ५७) असे संशयित लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. त्याची नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाण्यात असून या प्रकरणात तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांचेही नाव समोर आले आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी होणार आहे.

आणखी वाचा-‘एमपीएससी’ची दिरंगाई! मागणीपत्र असूनही अद्याप ‘या’ पदांसाठी जाहिरात नाही

एका तक्रारी अर्जाची चौकशी सहायक फौजदार मोरे याच्याकडे होती. ज्याच्या विरूध्द तक्रार होती त्या व्यक्तीला मोरे याने बोलावून घेतले आणि तक्रारी अर्जानुसार गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविली. तेव्हा संबंधित व्यक्तीने गयावया करून गुन्हा दाखल करू नये म्हणून विनवणी केली. तेव्हा तक्रारी अर्जाच्या चौकशीत सहकार्य करून कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच पोलीस ठाण्यात आणून जमा केलेली पिकअप व्हॅन गाडी सोडण्यासाठी सहायक फौजदार संजय मोरे याने पाच लाख रूपयांची लाच मागितली. ही लाच मोरे याने स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनपुडे-पाटील यांच्यासाठी मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील सहायक पोलिस आयुक्त गणेश कुंभार यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात सहायक फौजदार संजय मोरे याच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी, हवालदार शिरीषकुमार सोनवणे, अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला यांच्या पथकाने भाग घेतला होता.