BSNL Recruitment 2023: नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमने BSNL हरियाणा अॅप्रेंटिस भरती 2023 ची सूचना प्रकाशित केली आहे. ही भरती हरियाणा सर्कलसाठी आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बीएसएनएल हरियाणाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात.

यासाठी भारतीय संचार निगम लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला (portal.mhrdnats.gov.in.) भेट द्या. नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संचार निगम लिमिटेड, हरियाणा टेलिकॉम सर्कलने अप्रेंटिस कायद्या 1961 अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणासाठी 40 पदांची भरती केली आहे. त्यांची नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल.

pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?

महत्त्वाच्या तारखा येथे पहा

भारतीय संचार निगम लिमिटेडमध्ये शिकाऊ पदासाठी अर्ज भरण्यास आजपासून म्हणजेच २४ मार्चपासून सुरुवात झाली असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२३ आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात फॉर्म भरावा. या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो. इतर कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

हेही वाचा : SSC Recruitment 2023: 200पेक्षा जास्त पदांसाठी होणार भरती, लवकर करा अर्ज

कोण अर्ज करू शकतो

पात्रता तपशील पाहण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकता.

थोडक्यात, कोणत्याही प्रवाहातील पदवीधर उमेदवार किंवा डिप्लोमा धारक अर्ज करू शकतात. हे पदवीधर तांत्रिक किंवा अतांत्रिक कसे असू शकतात. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, 25 वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.

तुम्हाला किती पगार मिळेल

निवड झाल्यास तंत्रज्ञ अप्रेंटिस किंवा कोणत्याही शाखेतील डिप्लोमा धारकास 8,000 रुपये स्टायपेंड मिळेल.ग्रॅज्युएट अप्रेंटिस किंवा डिग्री अप्रेंटिस कोणत्याही शाखेचा असेल तरी 9,000 रुपये स्टायपेंड मिळेल.