शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सत्तेत येताना त्यांनी याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या मात्र, अद्याप त्यांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे सरकारची फसवणुकीची मालिका सुरुच असून याबाबत सभागृहात सरकारला धारेवर धरणार आहोत असे, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीस म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना २५ हजार ते ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊ असं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, यातील एक नवा पैसा अद्याप त्यांना मिळालेला नाही. त्याचबरोबर कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या लावू असंही या सरकारनं सांगितलं होतं. तसेच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु, त्यांचा सातबारा कोरा करु असं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र, यांपैकी एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली असून ही फसवणुकीची मालिका अद्याप सुरु आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget session government still doing a series of frauds says fadnavis aau
First published on: 24-02-2020 at 11:14 IST