अकोल्यात एक इमारत कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय. तर मृत महिलेच्या कुटुंबातीलच अन्य तीन जण जखमी झालेत. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तेलीपुरा चौकामध्ये ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या इमारतीखाली चोपडे कुटुंबातील कल्पना चोपडे, मंगेश चोपडे ,सुनीता चोपडे आणि योगेश चोपडे हे चारही सदस्य ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. तेलीपुरा चौकामध्ये जानकी रामजी चोपडे यांचे यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी कल्पना चोपडे, मोठा मुलगा मंगेश चोपडे, त्यांची पत्नी सुनीता चोपडे व लहान भाऊ योगेश चोपडे हे राहतात. रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान जानकीराम चोपडे यांचे कुटुंबीय भोजन केल्यानंतर घरात बसले होते. त्यावेळी अचानक जीर्ण झालेली तीन मजली इमारत अचानक कोसळली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, पालिका कर्मचारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. इमारत कोसळल्याची घटना घडताच काही वेळातच महापालिकेची जेसीबी घटनास्थळावर बोलावण्यात आली. मात्र कोसळलेली इमारत अरुंद जागेत असल्याने जेसीबी नेण्यास अडथळा निर्माण झाला. इतरांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आलं मात्र, ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागल्याने कल्पना चोपडे यांचा मृत्यू झाला.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Building collapsed in akola one lady died
First published on: 19-12-2018 at 11:01 IST