वाई: पुणे बंगळुरू महामार्गावर आनेवाडी टोल नाक्याजवळ असणाऱ्या उड्डाण पुलावर साताऱ्यातून पुण्याकडे जाणाऱ्या विठाई बसने अचानक पेट घेतल्याने फक्त वीस मिनिटात संपूर्ण बस जळून खाक झाली. चालक वाहकाने प्रसंगावधान दाखविल्याने सर्व प्रवासी बसमधून सुखरूप उतरल्याने जिवीत हानी झाली नाही. मात्र बस पूर्ण जळून खाक झाली.
ऐन उन्हाळ्यात सकाळी साडेअकरा वाजता महामार्गावर बर्निंग बसचा थरार पहावयास मिळाला. सुदैवाने चालक वाहकांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवाशी बस मधून सुखरूप उतरल्याने जिवीत हानी झाली नाही, यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
आणखी वाचा-शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून आयटी इंजिनिअरला अटक
राधानगरी-कोल्हापूरहून बस स्वारगेटकडे निघाली होती. बस क्रमांक (एमएच- १३-८४१३) बस पुणे-बंगळुरू महामार्गावरून सताऱ्याकडून पुण्याकडे जात असताना येथील टोल नाक्याजवळ असणाऱ्या आनेवाडीच्या उड्डाण पुलावर बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याचे चालक सागर चौगुले यांना दिसले. क्षणात त्यांनी बस थांबवून वाहक सोनल चौगुले यांच्यासह सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. दहा ते पंधरा मिनिटात संपूर्ण बस जळून खाक झाली महामार्गवर यावेळी धुळीचे लोट पहावयास मिळाले. भुईंज पोलीसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. वाई पालिका आणि किसन वीर साखर कारखान्याच्या आग बंबानी आग विझवली. तर प्रवाशांना दुसऱ्या बसने पुण्याकडे रवाना करण्यात आले.