राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटला आहे. मात्र एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. शिंदे सरकारची वैधता, शिंदे गटातील आमदारांच्या निलंबनाची मागणी, विधानसभा अध्यक्षांची निवड या सर्व प्रकरणांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे म्हटले जात असताना भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी नवी तारीख दिली आहे. १५ ऑगस्टच्या अगोदर मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> “राजभवनाला घेराव घालणार”, नाना पटोलेंकडून काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

“मंत्र्यांचा शपथविधी नेमका कधी होणार याबाबत कोणालाही माहिती नाही. मात्र साधारणत: १५ ऑगस्टच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे हे झेंडावंदन आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार निश्चित होईल, याबाबत मनात शंका नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा >>> संजय राऊतांना आणखी एक धक्का, पत्नी वर्षा राऊतांनाही पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स

याआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्ट रोजी केला जाणार असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले होते. यावेळी ज्येष्ठ आमदारांचा शपथविधी होईल. यामध्ये भाजपाचे सात आणि शिंदे गटातील सात आमदारांचा समावेश आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र आता सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार येत्या १५ ऑगस्टच्या अगोदर होणार, अशी माहिती दिली आहे.

हेही वाचा >>> राहुल गांधी म्हणाले “RSSने ५२ वर्षांपर्यंत तिरंगा फडकवला नाही” आता भाजपाचे जशास तसे उत्तर, प्रल्हाद जोशी म्हणाले…

दरम्यान, राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील संघर्षावर गुरुवारी (४ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीतही कोर्टाने याबाबत स्पष्ट निर्णय दिला नाही. मात्र पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायचे का? याबाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबवला जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

भाजपामधून कोणाला संधी मिळणार?

१) चंद्रकांत पाटील
२) सुधीर मुनगंटीवार
३) गिरीश महाजन
४) प्रवीण दरेकर
५) राधाकृष्ण विखे पाटील
६) गणेश नाईक
७) रवींद्र चव्हाण

शिंदे गटातील संभाव्य मंत्री कोण?
१) दादा भुसे
२) उदय सामंत
३) गुलाबराव पाटील<br>४) शंभूराज देसाई
५) संदीर भुमरे
६) संजय शिरसाट
७) अब्दुल सत्तार</p>

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे.