राज्यात सुपर मार्केटमध्ये वाई विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाकडून या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी थेट संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाईन व्यवसायात भागीदारी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वाईन विक्रीचा हा निर्णय वादात सापडला असताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तसेच, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच, असं देखील म्हटलं आहे.

साप साप करून भुई…

छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये बोलताना वाईन विक्री निर्णयाचं समर्थन करताना भाजपावर निशाणा साधला आहे. “मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मद्य घरात ठेवायला परवानगी दिली आहे. बार उघडायला परवानगी दिली आहे. आख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे. त्यात शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे. त्यामुळे उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्याचं काम आहे. काहीतरी विषय काढून त्याच्यावर आंदोलन करायचं हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

Ajit pawar explaination on controversial statement
“निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा”, वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले “सुशिक्षित वर्गाची…”
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”

“राऊतांच्या कुटुंबियांची वाईन उद्योगात पार्टनरशिप”, किरीट सोमय्यांनी सादर केली कागदपत्र!

सोमय्यांचे राऊतांवर आरोप

वाईन विक्रीच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्या संजय राऊतांवर किरीट सोमय्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. “संजय राऊतांच्या कुटुंबीयांची अशोक गर्ग नावाच्या वाईन व्यवसायात भागीदारी आहे. त्यांच्या दोन्ही मुली या व्यवसायात संचालक आहेत”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

“अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद आणि ढोकळा विकतो का?” वाईन व्यवसाय भागीदारीच्या आरोपावर संजय राऊतांचं टीकास्त्र!

राऊतांचं सोमय्यांना प्रत्युत्तर

किरीट सोमय्यांच्या या आरोपांना संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. “अशोक गर्ग माझे मित्र आहेत. किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे विकतात का? भाजपा नेत्यांची मुलं केळी विकतात का? अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? कुणाची मुलं काय विकतात हा व्यक्तिगत प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची मुलं वांद्र्याच्या किंवा पेडर रोडच्या रस्त्यांवर स्टॉल टाकणार आहेत का? की डान्सबार टाकणार आहेत नाचवायला?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.