आठवळ्याभरात दारु दुकाने सुरु होण्याची शक्यता ?

चंद्रपूर:राज्य शासनाने अधिसूचना जारी करून परवाना नुतणीकरणाचे निर्देश दिल्यानंतर दारूबंदी उठविण्याच्या निर्णय शासन मागे घेणार नाही, हे स्पष्ट झाले. येत्या दहा दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील दारुविक्रीची दुकाने सुरु होण्याची शक्यता आहे. दारुबंदी उठविण्याच्या निर्णयाविरोधात कुणी न्यायालयात गेले तर आपली बाजू ऐकुन घ्यावी, यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या राज्यातील मुंबई, औरंगाबाद आणि मुंबई खंडपीठात कॅवेट दाखल केले आहे. एक एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू झाली.२७ मे २०२१ रोजी दारुबंदी उठविण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रींमंडळाने घेतला. दारुबंदी हटविण्याच्या निर्णयाला राज्यभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.  ८ जुन २०१२ रोजी   गृह विभागाने  अधिसूचना काढून परवाने नुतणीकरणाचे आदेश दिले आहे. अधिसूचनेनंतर दारुविक्रीच्या परवान्यांचे नुतणीकरणाचे काम सुरू झाले आहे. येत्या आठ ते दहा दिवसात दारु विक्रीची दुकान सुरु होवू शकतात, असे सुत्रांचे म्हणणे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देशी दारु (किरकोळ विक्री)  ९८, बिअर शॉपी ५०  बार अँन्ड रेस्टॉरंट ३१४, आणि  क्लबचे दोन परवाने नुतणीकरणासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. वॉईन शॉपचे आधी २४ परवाने होते. आता केवळ ५ वाईन शॉपचे परवाने जिल्ह्यात आहे. नुतणीकरणासाठी २०२०-२०२१ या वर्षांचे शुल्क आकारले जाणार आहे. यातून दोन ते अडीच कोटींचा महसूल शासनाला मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caveat filed in all the three branches of the high court regarding liquor ban in the chandrapur zws
First published on: 11-06-2021 at 23:29 IST