कोथळा, खंजीर आणि संजय राऊत…, शिवसेना-भाजपा संघर्ष सुरूच; चंद्रकांत पाटील म्हणाले,..

संजय राऊत यांचं वाक्य तर खूप भयंकर असून उद्धव ठाकरे यांनी अ‍ॅक्शन घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले.

आता पुढील निवडणुका कुठल्याही मोठ्या पक्षाबरोबर युती करणार नाही. कारण आमच्या बरोबर राहून आमच्या मताच्या आधारे जागा वाढवून आणि त्या वाढलेल्या जागांच्या आधारे दुसऱ्याशी बार्गेनिंग करून विश्वासघात केलेला आम्हाला चालणार नाही. यापुढे आम्ही आमच्या ताकदीवर विजयी होऊ अशी भूमिका भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील मांडत शिवसेनेला त्यांनी टोला लगावला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत हे शरद पवारांसाठी काम करतात. उद्धव ठाकरे यांना हे कळत नाही की राष्ट्रवादी त्यांची एक एक पंचायत समिती खात आहे आणि त्यांचे कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीत जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मजबूत होत असून यात हे फक्त ‘आगे बढो आगे बढो’ म्हणतायत.

हेही वाचा – “कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते…”; चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांवर पलटवार!

तसेच ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातील शाळेत आता धडा द्यायचं राहिलं आहे की, पवार यांनी कोणाकोणाच्या पाठीत खंजीर खुपसला. वसंतदादा यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, वा राऊत वा! तुम्ही तर इतिहास बदलायला निघालात”.

ते पुढे म्हणाले की, “मी पाठीत खंजीर खुपसला अस सांगितलं आणि ते त्यांना झोंबले. त्यावर संजय राऊत असं म्हटले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर कोथळा बाहेर काढतो. यावर मी उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे आणि कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की, यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्या. जर राणे यांच्या एक थोबाडीत मारली असती. या वाक्यावर त्यांची अटक होते. मग संजय राऊत यांचं वाक्य तर खूप भयंकर असून उद्धव ठाकरे यांनी अ‍ॅक्शन घेतली पाहिजे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chandrakant patil on sanjay raut sharad pawar uddhav thackeray bjp shivsena vsk 98 svk