राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…

भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? याबाबतही दिली आहे प्रतिक्रिया

मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? हे प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झालेले आहे. दरम्यान, या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ”मनसेचे संस्थापक राज ठाकरे, यांची आणि माझी नाशिकला अचानक भेट झाली. आम्ही दोघेही नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी आमचं असं बोलणं झालं की, मुंबईत कधीतरी घरी भेटू. ही राज्यातील सर्वांची संस्कृती आहे. पहिला मुद्दा म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी का गेले? मग त्यांनी त्यांना भाजपाच्या प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं? मूळात मी असा अहंकार माननारा नाही. भाजपाचीच नाही तर राज्याची ही परंपरा आहे, संस्कृती आहे. की कुणीतरी घरी ये म्हटलं तर आपण हो म्हणतो. यामध्ये कोणी कोणकडे जायचं हा मुद्दा नाही.”

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परंप्रांतियाबद्दलची भूमिका बदलल्या शिवाय आम्ही युतीसंदर्भात चर्चाही करू शकत नाही, हे अगोदरच स्पष्ट केलेलं आहे. राज ठाकरेंनी मला त्यांच्या भाषणाची एक क्लिप मला पाठली होती. ते उत्तर भारतीयांसमोर त्यांनी केलेलं भाषण उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप व्हायरल झालं आणि ते ऐका असं त्यांनी सांगितल्याने मी ते ऐकलं. ते ऐकल्यानंतरही माझ्या मनात काही मुद्दे होते. ते मुद्दे घेऊन आमच्याच चर्चा झाली. त्यामुळे सदिच्छा भेट, राजकीय चर्चा असेल तर ती, युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसंदर्भातील राजकीय चर्चा झाली.

तसेच, दोन भूमिका कुठल्याही माणसाच्या असतात, एक माणूस म्हणून आणि एक नेता म्हणून. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकेवर चर्चा करायची होती. ज्या काळत मुंबईत मी विद्यार्थी दशेत होतो आणि अभाविपचं काम करायचो त्यावेळे ते भारतीय विद्यार्ती सेनेचं काम करायचे, तेव्हापासूनच माझ्या मनात नेहमी त्यांच्याबद्दल आकर्षण राहिलेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं आहे, केवळ दिसण्यापुरतं नाही तर बोलण्यातील स्पष्टता, आपल्या मुद्दयांवर आग्रही राहणं. त्यामुळे व्यक्ती म्हणून एकमेकांचं सुख पाहणं, यश पाहणं हे आलंच. परंतु त्यांनी मोठ्या भूमिकेतही यायला पाहिजे हे एक माणूस म्हणून त्यांना म्हणणं वेगळं, पण मी भाजपाचा राज्याचा अध्यक्ष आहे. त्या भूमिकेतून आज मनसे व भाजपा एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव नाही. असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते –

याचबरोबर ”प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, यावर माझा विश्वास आहे. नाहीतर नाशिकला प्रवासाला तेही जातात व मी ही जातो, पण नाशिकमध्ये असं अचानक भेटण्याचं काही कारण नव्हतं. आम्ही काही ठरवून भेटलो नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. मी मागील वर्षभरापासून बोलतोय, की त्यांनी त्यांची भूमिका बदलली पाहिजे. पण समोरासमोर आलो आम्ही नाशिकला. त्यानंतर आजची वेळ यायची होती.” असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.

राज ठाकरे – चंद्रकांत पाटील भेट; राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज (शुक्रवार) सकाळी साडेअकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कृष्णकुंज येथे पोहचले होते. ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेले असले, तरी देखील या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिवाय, राजकीय वर्तुळात देखील तर्कवितर्कांना उधाण आल्याचं दिसत आहे. भविष्यात भाजपा व मनेस यांची युती होणार का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात सध्या निर्माण झालेला आहे. तर, मागील २० दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने, चर्चा अधिकच रंगल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patils big statement after meeting raj thackeray said msr

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या