छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानामुळे निर्माण झालेला वाद अद्याप शमला नसून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव वाढविला आहे. राज्यपालांना दोन-चार दिवसांमध्ये न हटविल्यास ‘महाराष्ट्र बंद’सारखे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. पण, त्यांचा अपमान झाल्यावर भाजपाकडून गुळगुळीत प्रतिक्रिया दिल्या जातात. केंद्रात ज्यांचं सरकार आहे, त्यांच्या विचारांची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात. या माणसांची कुवत काय असते, यांची पात्रता काय असते? वृद्धाश्रमात जागा नाही म्हणून राज्यपाल करता का? बाप हा बाप असतो, नवा की जुना असा प्रश्न नसतो. हे सॅम्पल वृद्धाश्रमात पाठवा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने पाठवू,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता.

यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत हीच संस्कृती शिकवली का?, असा सवाल विचारला आहे. “राज्यपाल यांच्याबद्दल या पद्धतीने बोलणं योग्य नाही. कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे आम्ही समर्थन करत नाही. राज्यपालांचे वय आणि वृद्धाव्यस्था काढणे बरोबर नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी हीच संस्कृती शिकवली का?,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule slams uddhav thackeray statement over governor bhagatsingh koshyari ssa
First published on: 25-11-2022 at 14:25 IST