येवला येथे करोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ आले असता पत्रकारांनी त्यांना राज्य सरकारने क्रूझ पार्टीला परवानगी दिल्याबाबत प्रश्न विचारला. यावर भुजबळ यांनी या पार्टीला कोणी परवानगी दिली हे मला काय माहित नाही, असं सांगितलं. मात्र, राज्य सरकार हॉटेलला, लॉन्सला परवानगी देते म्हणजे या ठिकाणी बाकीचे धंदे करा असं काही सांगत नाही, असंही स्पष्ट केलं. हॉटेलला परवानगी दिली म्हणून सरकार यात कसं काय दोषी? असा सवालही त्यांनी विचारला.

“आरोग्यमंत्री राजेश टोपेंची जागा भविष्यात आर्थर रोड जेलमध्ये?”

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जागा भविष्यात आर्थर रोड तुरुंगात आहे, अशी विरोधकांनी टीका केली. यावर छगन भुजबळ म्हणाले, “हे सर्व ऑर्डरच सोडत असतात याला जेलमध्ये, त्याला जेलमध्ये, त्या मंत्र्याला जेलमध्ये मग हे सांगितल्यावर कुठली ना कुठली यंत्रणा कामाला लागते. त्यापेक्षा तुम्ही चांगलं काम करा ना.”

गोपीचंद पडाळकरांनी झेड प्लस सुरक्षेचा गृहमंत्री कुठे सापडेना असा घणाघात केला आहे. यावर भुजबळांना विचारले असता ते म्हणाले, “माजी पोलीस आयुक्त हे पण गायब आहेत. त्यांना पण सुरक्षा असते. तक्रारदारच मुळात गायब आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज संजय राऊत नांदगाव मतदार संघाच्या दौरा आहे त्याबद्दल भुजबळांना विचारले असता, भुजबळ म्हणाले, “आम्ही अनेक ठिकाणी ऑक्सिजन यंत्र बसवले आहेत. नक्कीच संजय राऊत नांदगाव येथे गेल्याने आनंदाची गोष्ट असून विकासाच्या  दृष्टीने पुढे अजून काय करता येईल याचा विचार होईल.”