राजकीय विरोधकांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा इशारा
‘मी अडचणीत वगरे काही नाही, पण माझयावर असणाऱ्या आरोपांच्या तपासावरुन मी अडचणीत आल्याचा कांगावा केला जात आहे. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र जाणूनबुजून अडचणीत आणणाऱ्यांना सोडणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी कॉगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव (ता खंडाळा)येथील १८५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. घोटाळयांच्या आरोपांचा तपास सध्या सुरु आहे. याचा फायदा उठवून मी अडचणीत आल्याचा कांगावा होताना दिसत आहे. मात्र असे काही नाही. न्याय व्यवस्थेला त्यांचे काम करुद्यात आणि सत्ताधारी मंत्र्यांनीही त्यांचे काम करावे . लढणे हा माझा अधिकारच असल्याने जाणूनबुजून अडचणीत आल्याची आरोळी ठोकणाऱ्यांना मी सोडणार नाही.
महाराष्ट्र सदन घोटाळा व इतर कारणावरुन मी अडचणीत आल्याचा भास निर्माण केला जात आहे. ‘अडचणीत वगरे काही नाही ’. कागदोपत्री सर्व ठीक आहे. या सर्व नाटयातून आपले निर्दोषत्व लवकरच सिध्द होईल. ज्यांना अधिकार नाही तेच मी दोषी असल्याची आरोळी ठोकत आहेत.देशातील न्यायव्यवस्था झोपलेली नाही.त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळणार असून आपण निर्दोष असल्याचे सिध्द होणार आहे. नायगाव हे आपले ऊर्जा स्तोत्र आहे. येथील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने निधी दयावा. शाहू, फुले, आंबेडकर यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात हे महानायक पडद्याआड राहू नयेत,असेही भुजबळे म्हणाले. या वेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक िनबाळकर, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील,माजी आमदार कांताताई नलावडे,कृष्णकांत कुदळे,कमलताई ढोले पाटील आदी उपस्थित होते.