छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अनेक कागदपत्रं आणि ऐतिहासिक गोष्टी आज आपल्याला वस्तुसंग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. परंतु हे कागदपत्र किंवा दस्तऐवज पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नेमकं हस्ताक्षर कसं होतं? हा प्रश्न अनेकांना पडत असेल. शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक पत्र पैठण येथील (औरंगाबाद) ज्ञानेश्वर उद्यानात बघण्यासाठी ठेवण्यात आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः मोडीलिपीत लिहिलेलं पत्र संत ज्ञानेश्वर उद्यानातील राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या बाळासाहेब पाटील पुराणवस्तू संग्रहालयात शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. हा अनमोल ठेवा पाहण्यासाठी या संग्रहालयात जगभरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करतात.

कधी आणि कोणासाठी लिहिले होते हे पत्र?

शिवाजी महाराजांनी भोसले घराण्यातील धार्मिक विधी करण्याचे अधिकार पैठण येथील गोविंद कावळे भट यांना दिले होते. या संबंधीचा उल्लेख या पत्रात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुराणवस्तु संग्राहक बाळासाहेब पाटील यांचे पुत्र जयवंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज भोसले घराण्यातील पुर्वजांच्या वंशावळीची माहिती मिळवण्यासाठी पैठण येथे आले होते. त्यावेळी कावळे भट यांनी त्यांना ही माहिती मिळवून देण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे आनंदी झालेल्या महाराजांनी भोसले घराण्यातील कुणीही पैठणला येईल त्यावेळी त्यांचे धार्मिक विधी करण्याचे अधिकार या पत्राद्वारे कावळे भट यांना दिले होते.