पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना चिपळूणकरांनी धरलं धारेवर; नागरिकांचे संतप्त सवाल

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. यावेळी स्थानिकांना त्यांना धारेवर धरलं.

Aditya-Thackeray-Chiplun1
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना चिपळूणकरांनी धरलं धारेवर; नागरिकांचे संतप्त सवाल

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी आणि समस्या जाणून घेतल्या स्थानिकांना त्यांना धारेवर धरलं. पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यांचे संतप्त प्रश्न ऐकून घेतले आणि मदत करण्याचं आश्वासन दिलं.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हा पाहणी दौरा नाही हा मदत दौरा आहे. आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे. आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि सेवाभावी संस्थानी रेस्क्यूमध्ये खूप काम केलं आहे. अजूनही काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे. पण पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाकडून मदत सुरु करण्यात आली आहे.”, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. “ही वेळ राजकारण बाजूला ठेवायची आहे. आपण सगळे मिळून लोकांसाठी काम करत आहोत. पंचनामे पूर्ण झाल्यावर त्यांना सर्वोतोपरी मदत मिळेल. सध्या आरोग्य तपासणी, घरगुती सामान आणि स्थलांतर या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे”, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

कोकणातील आठ हजार २३७ हेक्टर शेतीचे नुकसान

नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त झाल्यावरच मदतीच्या पॅकेजबाबत निर्णय घेतला जावा यावर सर्वाचे एकमत झाले. परिणामी सध्या प्रचलित नियमानुसार तातडीने मदतीचे वाटप करण्यात यावे आणि अतिवृष्टीत आतापर्यंत २१३ लोकांचा मृत्यू झाला असून आठ जण बेपत्ता आहेत. तर ५२ लोक जखमी झाले असून ४०० जणावरे तसेच ६० हजार कोंबडय़ा दगावल्या आहेत. अतिवृष्टीमुळे १४०० गावांना फटका बसला असून पूरग्रस्त भागातील चार लाख ३५ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोकणातील १०४९ गावातील आठ हजार २३७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून १२०० घरांना फटका बसला आहे.

पूरग्रस्तांच्या खात्यात शुक्रवारपासून जमा होणार १० हजारांची मदत; विजय वडेट्टीवरांची माहिती

दुसरीकडे, कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र पावसामुळे अनेक ठिकाणी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. राज्याती स्वयंसेवी संस्थासह अनेक नागरिकांनी आपापल्या परीने आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली आहे. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chiplun flood affected victim ask question to aditya thackeray rmt

ताज्या बातम्या