बलात्कार रोखण्यासाठी शरियासारखा कायदा लागू करण्याची गरज आहे. बलात्कार करणाऱ्यांचे हात-पाय तोडले पाहिजेत, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यांनी सोमवारी कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला. बलात्कार करणाऱ्यांना कडक शासन करण्यासाठी शरियासारखा कायदा हवा. बलात्काऱ्यांचे हात-पाय तोडले पाहिजेत, असे राज यांनी म्हटले. यावेळी राज यांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराचा मुद्दाही उपस्थित केला. अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्यास पर्याय पाहिजे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच राज यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. राज्यात सरकार बदलले आहे, याची जाणीव लोकांना होऊ द्या. कायदयाचा धाक निर्माण झाला पाहिजे असे सरकारचे काम हवे. केवळ शस्त्र परवाने देऊन उपयोग नाही, कायद्याचा धाक हवा, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
तिसरी निर्भया आता होवू देवू नका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला संरक्षणासाठी शस्त्रपरवाना देण्यात येईल, असे आश्वासनही दिले होते. तसेच या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करू असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना दिले होते. या भेटीच्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुतेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोपर्डी दौ-याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. तसेच या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशीही कोणत्याही प्रकराचा संवाद साधला नव्हता.
सैराटमुळे बलात्कार होत असतील, तर मला फासावर चढवा: नागराज मंजुळे



