Devendra Fadnavis First Speech After Taking Oath: भाजपाच्या कार्यकाळात संविधानावर आघात केले जात असून ते बदलण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळीही ती झाली आणि तशीच नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही झाली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून हा अपप्रचार करण्यात आला असून त्याचा फटका बसल्याचा दावा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यामुळे संविधानाचा मुद्दा चर्चेत असतानाच महाराष्ट्रात सत्तास्थापनेनंतरच्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी “संविधानानुसारच कारभार चालणार”, अशी ग्वाही दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर आज भीमसागर लोटल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यानंतर केलेलं भाषण हे तिन्ही सत्ताप्रमुखांचं शपथविधीनंतरचं पहिलंच भाषण होतं. या भाषणात तिघांनीही संविधानानुसारच काम करण्याची ग्वाही जनतेला दिली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis Said This Thing About Panipat War
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार! “पानिपत म्हणजे मराठी माणसाचा अभिमान, ज्या प्रकारे मराठ्यांनी…”
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्ष जे सांगेल…”

संविधानाला आदर्श मानूनच काम होईल – अजित पवार

“काल पंतप्रधानांच्या उपस्थितीत काल शपथविधी सोहळा पार पडला. महायुतीचं सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व भारतीय संविधानाला आदर्श मानून काम करेल हे मी स्पष्टपणे सांगतो. यापूर्वीही राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना, कोणताही निर्णय घेताना तो व्यापक जनहिताचा असला पाहिजे, राज्यातल्या दुर्बल, वंचित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे याची काळजी आम्ही घेतली आहे”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितलं.

मोदींच्या काळातच संविधानाचा सर्वाधिक सन्मान – एकनाथ शिंदे

लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रातील भाजपा सरकार संविधान बदलण्याचा प्रयत्न करत असल्याची व्यापक टीका विरोधकांनी केली होती. मात्र, आज केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींच्याच काळात संविधानाचा सर्वाधिक सन्मान झाल्याचं विधान केलं. “खरंतर काल आम्ही घेतलेली शपथ संविधानाची होती. चंद्र, सूर्य आणि सत्य या तीन शाश्वत गोष्टींबरोबर चौथी शाश्वत गोष्ट कोणती असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांचं सविधान”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

इथे पाहा भाषणांचा संपूर्ण Video!

“मी नेहमी म्हणतो, एका सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता या पदापर्यंत पोहोचू शकतो याला कारण बाबासाहेबांचं संविधान आहे. सामान्य कुटुंबातली व्यक्ती देशाची पंतप्रधान होऊ शकते, आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते याला कारण फक्त बाबासाहेबांचं संविधान आहे. बाबासाहेबांचं संविधान सत्ताधाऱ्यांना जागं ठेवतं, झोपू देत नाही. म्हणून आम्ही गेल्या अडीच वर्षांपासून जागे राहून काम करत राहिलो. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर आपल्या देशाचा, राज्याचा कारभार चालतो. संविधानाचा सर्वाधिक सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातच झाला. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे”, असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis : “एक तर तू राहशील किंवा मी राहीन”, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

जे काही करू ते संविधानाला अनुसरूनच – देवेंद्र फडणवीस

“भारत एवढी प्रगती करतोय त्याचं श्रेय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला आहे. जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि उत्तम संविधान कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे. कारण हे संविधान सामान्य व्यक्तीच्या जीवनात सामाजिक-आर्थिक परिवर्तन करण्याचा मूलमंत्र समोर ठेवून तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच आज कोणत्याही समस्येचा उपाय संविधानात पाहायला मिळतो. आम्ही जे कार्य करू, ते संविधानाला अनुसरूनच करू. समाजातल्या वंचिताचाच विचार पहिल्यांदा आमच्या सर्वांच्या मनात असेल”, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेला दिली.

Story img Loader