केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुंबईमध्ये महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले. भाजपाच्या मिशन १५० ची घोषणा करताना शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. २०१९ साली मुख्यमंत्रीपदासंदर्भात झालेल्या वाटाघाटीवरुन युती तुटल्याचासंदर्भ देत उद्धव यांनी विश्वासघात केल्याचा आरोप शाह यांनी केला. यावरुन भाजपा आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात विधान केलं आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यादरम्यान झालेल्या त्या बंद दाराआडच्या बैठकीत आपण उपस्थित नव्हतो. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीमध्ये गेल्यावर आपण यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांच्याकडे चौकशी केल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> राज ठाकरेंसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली? मनसेसोबत युती झाल्यास पुढील प्लॅन काय? CM शिंदे म्हणाले, “राज ठाकरेंवर जेव्हा…”

“अमित शाह आज एक गोष्ट बोलले की धोका देणाऱ्यांना जमीनीवर आणा, यावर तुमचं काय मत आहे?” असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी, “त्यांचं आणि कोणाची जी काही चर्चा झाली. त्याप्रमाणे ते बोलले असतील,” असं उत्तर दिलं. त्यावर पुन्हा शिंदे यांनी, “तुम्ही होता तेव्हा शिवसेनेमध्ये” असं विचारण्यात आलं. तेव्हा शिंदे यांनी, “हो, होतो ना. पण चर्चेत नव्हतो मी,” असं स्पष्टपणे सांगितलं. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदेंनी हे विधान केलं आहे.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

पत्रकाराने शिंदे यांना याचवरुन, “तुमचं मत काय? तुम्हाला कळलं असेल ना काय झालं होतं वगैरे,” असं विचारलं. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तर उत्तर देताना, “मी याबाबतीत यापूर्वी देखील बोललो आहे. हे जे काही घडलं आणि आम्ही जो निर्णय घेतला तो राज्याच्या हिताचा झाला. यामध्ये जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांची संपर्क झाला. त्यावेळेस मी विचारलं उत्सुकतेपोटी काय आहे नक्की हे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं. जर आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांचं संख्याबळ कमी असताना त्यांना दिलेला शब्द पाळला. संख्या कमी होती तरी त्यांना मुख्यमंत्री केलं. आज सगळ्यांनाच वाटत होतं की भाजपाला मुख्यमंत्री पद हवं म्हणून हे सुरु आहे. त्यांनी जो सर्वांचा समज होता तो गैरसमज ठरवला. माझ्यासोबत ५० लोक असतानाही माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या सैनिकाला मुख्यमंत्री केलं,” असं उत्तर दिलं.

तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने, “आम्ही जर शब्द दिला असता तर मुख्यमंत्री पद द्यायला काही हरकत नव्हती. आमच्याकडे तर सारा देश आहे. एवढी राज्यं आहेत. आम्ही शब्द दिला असता तर दिलं असतं,” असं सांगितल्याचा खुलासा केला.

“म्हणजे भाजपाबरोबर विश्वासघात झाला?” असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पत्रकाराने विचारलं. त्यावर शिंदे यांनी, “२०१९ साली विश्वासघात मतदारांबरोबर पण झाला, ज्यांनी युतीला मतदान केलं होतं त्यांच्यासोबत झाला. शिवसेना-भाजपाच्या उमेदवार होते त्यांच्या होर्डिंगवर देखील बाळासाहेब आणि मोदीजी होते. लोकांना वाटलेलं युतीचं सरकार येईल. बाळासाहेबांची वैचारिक भूमिका होती काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊ नये. मात्र बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा झाली. लोकांना माहिती आहे कोणी योग्य केलं आहे, कोणी अयोग्य केलं आहे. लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय.
आम्ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जातो तिथे लोकांची गर्दी असते. अनेक लोक आम्हाला येऊ सांगतात चांगला निर्णय घेतला. राज्याच्या हिताचा निर्णय घेतला सांगतात. त्यामुळे ज्याचा त्याने विचार करावा,” असं सूचक विधान केलं.

ज्यांनी विश्वासघात केला आहे त्यांना विचारा असं उत्तर शिवसेनेकडून अमित शाहांच्या वक्तव्यावरुन दिलं जात आह. शिवसेनेचा रोख तुमच्या गटाच्या दिशेने आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, “पातळी सोडून बोलण्याचा माझा स्वभाव नाही. पण प्रत्येकाने पातळी संभाळून बोललं पाहिजे. २०१९ ला युतीचं सरकार स्थापन व्हायला हवं. तर तुम्ही लोकांना विचारायला हवं होतं आम्ही असं असं करतोय. जी चूक झाली, जो विश्वासघात झाला तो २०१९ साली झाला. तुम्ही त्याची दुरुस्ती केलीय,” असं शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं.