Shankarrao Chavan Government Hospital Nanded Deaths : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या ३६ तासांत ३१ मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेवरून विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. हाफकिनकडून औषधे घेण्यासाठी निधी नसल्याने औषधांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी औषधांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षणमंत्री, संबंधित विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकारी आज प्रत्यक्ष घटनास्थळी गेले आहेत. याबाबतीत प्राथमिक माहिती घेतली असता लक्षात आलं की, रुग्णालयात १२७ प्रकारच्या औषधांचा साठा होता. रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती. उलट त्या ठिकाणी औषध खरेदीसाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यताही दिली आहे. रुग्णालयात पुरेशी औषधं होती, किंबहुना तिथे जास्तीचा औषधसाठा होता.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही तिथे पुरेसे डॉक्टर्स आणि कर्मचारी आहेत का याची माहिती घेतली. तिथे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे. तिथे झालेल्या मृत्यूंची चौकशी होईल. चौकशीनंतर पुढची कार्यवाही केली जाईल. यात कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. राज्य सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. या घटनेची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परंतु, मृत्यूंच्या घटनेवर मी इथे सविस्तर बोलू इच्छित नाही.

हे ही वाचा >> “राज्यातील शासकीय रुग्णालये हा…”, नांदेडनंतर छ. संभाजीनगरच्या घटनेवरून आदित्य ठाकरेंचा संताप

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तिथे काही वयोवृद्ध रुग्ण होते, ज्यांना हृदयाचा त्रास होता. अपघातात जखमी झालेली एक व्यक्ती होती. तसेच ज्या लहान बालकांचा मृत्यू झाला आहे ती प्रीटर्म (प्रिमॅच्युअर – वेळेआधी जन्मलेले मूल) होती, त्यांचं वजनही कमी होतं. परंतु, या सगळ्या घटनेबाबत चौकशीअंती जो अहवाल येईल त्यानंतर अधिकृतपणे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. आत्ता मी एवढंच सांगतो की, झालेली घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. आता याप्रकरणी चौकशी होईल आणि पुढील कारवाई केली जाईल.