पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं दर्शन त्यांनी घेतलं आहे. यावेळी ईडा पिडा टळु दे. या बळीराजाला सुखी होऊ दे. या राज्यातल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायाच्या चरणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले की, “यंदाचा गणेशोत्सव अतिशय धुमधडाक्यात आणि आनंदामध्ये पुणेकर साजरा करत आहेत. सगळीकडे उत्साहात, सगळे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने मला आनंद होत आहे. नियमांचे उल्लंघन होत नाही आणि होणार नाही. या राज्यामधील आरिष्ट, सगळी संकट दुर होऊ दे. ईडा पिडा टळु दे, या बळीराजाला सुखी होऊ दे. या राज्यातल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे,” असे त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती केली. तसेच, शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची सुद्धा आरती केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde pune tour ganpati darshan ssa
First published on: 07-09-2022 at 18:08 IST