Eknath Shinde Speech in Khed Rally: दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार याबद्दल कमालीची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.