भोइंजमधील किसनवीर सातारा सहकारी कारखान्यातील २२ मेगावॅल्ट वीज प्रकाल्पाचा आज (रविवारी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि माणिकराव ठाकरे उपस्थित होते.
तेलंगणाप्रमाणे स्वतंत्र विदर्भाची मागणी देंवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, काँग्रेस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ते मान्य नाही.  आपण कोणत्याही परिस्थिती महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील अविकसित भागाच्या विकासासाठी राज्य सरकार लवकरच धोरण आखणार आहे. हा अविकसित भाग लवकरच विकसित केला जाईल. तसेच, साखर कारखान्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, साखर कारखान्यांनी आर्थिक शिस्त बाळगणे गरजेचे आहे. तसे जर न केल्यास राज्य सरकार त्यांना कोणतीही मदत करणार नाही. त्याचप्रमाणे या कारखान्यांनी पाण्यासाठी शासनावर अवलंबून न राहता कारखान्यासाठी पाण्याची व्यवस्था स्वतः करावी.