मुंबई – गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. केंद्रीय  भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कासू ते इंदापूर या टप्प्यातील कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.  सुतारवाडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम गेली बारा वर्षे रखडले आहे. अवजड वाहतूक आणि या परिसरात पडणारा पाऊस यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत होती त्यामुळे हे काम डांबरीकरण ऐवजी काँक्रिटीकरण माध्यमातून व्हावे अशी मागणी मी नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यास त्यांनी मान्यता दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७५० कोटी रुपये इतका खर्च येणार –

आता पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर अशा दोन टप्प्यात या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या कामाला ७५० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. कामाचा शुभारंभ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ३ एप्रिल रोजी होणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. दिघी ते माणगाव आणि इंदापूर ते आगरदांडा या राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण देखील  यावेळी होणार आहे