पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे पण कोणी लढण्यास तयार नसल्यास किंवा सारखं परदेशात जात असल्यास आम्ही तरी काय करणार, असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. युपीएचं अस्तित्व आहेच कुठे अशी विचारणाही त्यांनी केली. दरम्यान ममता बॅनर्जींच्या या टीकेवर राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. अशा वक्तव्यांनी आम्ही अस्वस्थ होणार नाही असं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

‘यूपीए’ अस्तित्वात आहेच कुठे?

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके
Criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Mahavikas Aghadi in bhandara
“उद्धव ठाकरेंचा आम्ही खूप वर्षे अनुभव घेतला, आता काँग्रेसला त्यांच्यासोबत…” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

“ममता बॅनर्जी आज युपीएच्या सदस्यही नाहीत. आतापर्यंत भाजपाला जो विरोध केला आहे तो काँग्रेसने, युपीएने, राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागणार आहे,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

दरम्यान यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वास्तव स्विकारण्यासंबंधी दिलेल्या सल्ल्याबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “नबाव मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावं हे काही योग्य नाही. काँग्रेसला सल्ला द्यावा अशी त्यांची पात्रताच नाही”.

ममतांच्या ‘युपीए अस्तित्वात आहेच कुठे?’ विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले “हे सत्य…”

“देशात काँग्रेस पक्ष असून तो भाजपाला विरोध करणारा आहे. पर्याय म्हणून काँग्रेस असून सर्वांचं सहकार्य घ्यावं लागेल हे खरं आहे. युपीए सर्वांचं सहकार्य घेतच असतं,” असंही यावेळी ते म्हणाले.

ममता बॅनर्जींनी काय म्हटलं –

काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि काँग्रेस अशी लढत होते त्याच राज्यांमध्ये भाजपा वाढत असल्याचे सांगत काँग्रेसला बुधवारी डिवचले. दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या ममतांनी यांनी काँग्रेसवर टीका केली. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे पण कोणी लढण्यास तयार नसल्यास किंवा सारखं परदेशात जात असल्यास आम्ही तरी काय करणार, असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना तसंच नागरी समाजाच्या सदस्यांशी संवाद साधताना बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या कमकुवतपणावर बोट ठेवलं. भाजपला समर्थ पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करावे काय, या प्रश्नावर यूपीएच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करीत ममतांनी यूपीएच्या मोकळय़ा खुर्चीवर त्यांनी बसावे काय, असा सवाल केला. समविचारी शक्ती एकत्र आल्यास भाजपचा पराभव करणे सहज शक्य असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. त्यासाठी जेथे ज्या पक्षांची ताकद आहे त्यांना अधिक महत्त्व द्यावे लागेल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठीच भेट दिल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितलं.