हर्षद कशाळकर

अलिबाग : रायगड जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या अनंत गोंधळी यांनी शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील पक्षसंघटना कठीण परिस्थितीत टिकवून ठेवणारा आणखीन एक शिलेदार पक्षाने गमावला आहे. माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अनंत गोंधळी यांची ओळख होती. यापूर्वी अलिबाग काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली होती.

Chandrakant Patil, shivsena candidate,
मागील विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील शिवसेनेचे उमेदवार पाडण्यात चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपच्या माजी नगरसेवकाचा गौप्यस्फोट
Shinde Senas struggle in BJPs stronghold washim cm Eknath Shindes bike rally in Washim today
भाजपच्या बालेकिल्यातच शिंदे सेनेची दमछाक, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशीममध्ये बाईक रॅली
nashik, Congress, Shirish Kotwal as Nashik District President, Nashik District congress President, Displeasure of local bearers, Shobha Bachhav Nomination in Dhule, dhule lok sabha seat,
काँग्रेस नाशिक प्रभारी जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल
Leader of Gadhinglaj Appi Patil join Congress with thousands of activists
गडहिंग्लजचे नेते अप्पी पाटील काँग्रेसमध्ये; हजारो कार्यकर्त्यांसह केला प्रवेश

शेकापचा बालेकिल्ला असलेल्या अलिबाग तालुक्यात काँग्रेसचे संघटन टिकवून ठेवण्यात त्यांचे महत्वाचे योगदान होते. गेली काही वर्ष ते जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पण मधुकर ठाकूर यांच्या निधनानंतर पक्षाला एकसंध ठेवू शकेल असा एकही नेता पक्षात उरला नाही. ठाकूर कुटुंबाचे गटतटाचे राजकारण सुरू झाले आणि पक्षाची वाताहत होण्यास सुरुवात झाली. मात्र तरीही गोंधळी खानाव, उसर परिसरात काँग्रेसचे अस्तित्व कायम राखले होते. मात्र मागील विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाने शेकापशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले तेव्हापासून मतदारसंघात काँग्रेसच्या अध:पतनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती.

अनेक नेत्यांनी काँग्रेसला पर्याय शोधण्यास सुरुवात केली. अमित नाईक, चारुहास मगर यांनी गेल्या वर्षी पक्षत्याग करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आता. गोंधळी यांच्या सारखा जनाधार असलेला नेताही काँग्रेसने गमावला. संघटनात्मक पातळीवर याची मोठी हानी होणार आहे. जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती फारशी चांगली राहिलेली माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काही महिन्यापूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. तर महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि प्रदेश सरचिटणीस असलेल्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

कर्जत तालुका अध्यक्ष शिवाजी खारीक यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्याने पक्षाची कोंडी झाली. त्यामुळे बुडत्याचा पाय आणखीन खोलात अशी गत काँग्रेसची झाली आहे. जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष होते. पक्षाचे तीन तीन आमदार जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून येत असत. पण बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पश्चात पक्षाची वाताहत सुरू झाली.  देशपातळीवर आणि राज्यपातळीवर स्वत:चे स्थान निर्माण करू शकेल असे नेतृत्व काँग्रेसला घडवता आले नाही. माणिक जगताप आणि मधुकर ठाकूर यांच्या पश्चात दुसरी फळी तयार होऊ शकली नाही. त्यामुळे वादळात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे पक्षाच्या संघटनेची वाटचाल सुरू आहे. पक्षाचे कोकणातील संघटनेच्या बाबत असलेले उदासीन धोरण याला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाची आणखीन वाताहत झाली तर नवल वाटायला नको अशी कुजबुज पक्षाच्या वर्तुळात सुरू आहे.