आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक पक्षाच्या नेत्यांनी टीकाही केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधला आहे.

“राष्ट्रपित्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांचा(भाजपा) ‘न्यू इंडिया’ केवळ काही मित्रांना श्रीमंत बनवण्याचा आहे. तर बाकीची लोकसंख्या ही दीन आणि भूकेली आहे. आम्हाला हा ‘न्यू इंडिया’ नकोय.” अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमृता फडणवीस यांच्या विधानावर टीका केली आहे.

Parambans Singh Romana on Narendra Modi
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक
Nana Patole and Ashok Chavan
भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”
State president of NCP Sharad Pawar faction Jayant Patil criticizes BJP
जयंत पाटील म्हणतात, ‘संविधान बदलण्याचा कट हा ‘त्यांच्या’ ४०० पारच्या घोषणेतून…”
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता यांनी उत्तरे दिली. न्यायमूर्ती म्हणून अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी भूमिका बजावली. संस्थेच्या प्रथम अध्यक्ष ताराबाई शास्त्री यांच्या स्मृतिनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.