माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी आणि त्यांच्याशी बोलताना वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेतील संवादाची कथित क्लीप व्हायरल झालीय. या प्रकरणामध्ये लोणीकरांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या क्लिपमध्ये लोणीकरांनी ज्या पद्धतीची भाषा वापरलीय त्यावर त्यांच्याविरोधात अ‍ॅस्ट्रॉसिटीअंतर्गत गुन्ह दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केलीय. तर दुसरीकडे राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनीही लोणीकरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.

काँग्रेसची मागणी काय?
भाजपाचे परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या औरंगाबादमधील बंगल्याचे थकीत वीज बिल भरलं नाही म्हणून मीटर इंजिनिअरने काढून नेले. त्यामुळे लोणीकर यांनी इंजिनिअरला शिवीगाळ केली. इंजिनिअरसोबत लोणीकरांच्या या संभाषणामध्ये लोणीकर यांनी महावितरण कंपनीमध्ये काम करणाऱ्या दलित कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली आहे, असं काँग्रेस अनुसूचित विभागाचे जालना जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी म्हटलं आहे. तसेच “लोणीकर यांनी झोपडपट्टीतील लोकांच्या घरी जाऊन वीज कनेक्शन तोडा असंही म्हटलं आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्यावर अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा घेवंदे यांनी दिलाय. यासंदर्भातील तक्रार जालना पोलिसांत काँग्रेसच्या अनुसूचित विभागातच्या वतीने घेवंदे यांनी केली आहे.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’

“भाजपाच्या आमदारांचं डोकं फिरलंय का?”
“अनेकदा या क्लिपमध्ये ते कर्मचाऱ्याला म्हणतायत तुझी लायकी आहे का? अहो आमदारसाहेब तुम्ही ३० वर्षे आमदार आहात. मंत्री राहिला आहात, तुमचीच लायकी आहे का भाऊ? तुम्ही गोरगरीबांच्या घराचे लाइट कनेक्शन बिनधास्त कापून न्या म्हणताय? दलित वस्त्यांवर जाऊन आकडे काढून दाखवा हरामोखरांनो, असं म्हणताय. ही भाषा तुमची? अहो आमदारसाहेब आता तरी वटणीवर या. भाजपाच्या आमदारांचं, मंत्र्यांचं डोकं फिरलंय की काय कळत नाही. नेहमीच तुम्ही दलित वस्त्यांच्या, झोपडपट्ट्यांच्या मुळावर का असता ओ?,” असा प्रश्न घेवंदे यांनी विचारला आहे.

ऊर्जामंत्र्यांचा टोला…
आमदार आणि माजी मंत्री असणाऱ्या लोणीकर यांची वीज कर्मचाऱ्यासोबतच्या संवादाची क्लीप व्हायरल झालीय. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरामधील अभियंत्याला लोणीकरांनी धमकवण्याबरोबरच त्याला आक्षेपार्ह भाषेमध्ये सुनावलं आहे. वीज कनेक्शन तोडल्या प्रकरणावरुन माजी मंत्र्यांनी आपला संताप व्यक्त करताना पातळी सोडून वक्तव्य केल्याचं या क्लिपच्या आधारे सांगितलं जात आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही या क्लिपबद्दल बोलताना, “राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद भुषविलेल्या व्यक्तीला ही भाषा शोभणारी नाही. संस्कारी पक्ष म्हणवणाऱ्या पक्षाचे ३० वर्षांहून अधिक काळ आमदार असलेल्या नेत्याने अशी भाषा वापरल्याने पक्ष संस्काराचा बुरखा फाटलाय,” असा टोला लगावलाय.

लोणीकरांचं स्पष्टीकरण…
दरम्यान लोणीकर यांनी, “वीज वितरण कंपनीच्या आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात असून मी कुठल्याही प्रकारचा फोन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लावलेला नाही. माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही. त्यामुळे मी फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.,काही षडयंत्र रचणाऱ्या लोकांनी माझी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केले आहे. व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप माझी नसून ते माझ्याविरुद्ध रचलेले कुभांड आहे,” असं फेसबुकवरुन स्पष्टीकरण देताना म्हटलंय.