गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यं करत महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप करताना नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आहे. दरम्यान वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला असताना नाना पटोले यांनी एबीपीशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास लावण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर होते असं सांगत नाना पटोले यांनी वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं सांगितलं आहे. पाळत ठेवण्याबाबत माझा सरकारवर कोणताही आरोप नसून मुंबईत आल्यावर यावर सविस्तर प्रतिक्रिया देईन असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत”; नाना पटोलेंचा आणखी एक गंभीर आरोप

नाना पटोलेंनी काय म्हटलं आहे –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. “सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले. “महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे,” असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

“नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर बोलणार नाही,” ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी लगावला टोला

“सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले. “महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे,” असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल

“महाराष्ट्रात काँग्रेस उभी होत असल्याचं त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,” असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…; नाना पटोलेंचं उद्धव ठाकरे, अजित पवारांवर टीकास्त्र

शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे

“स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार,” असाही आरोप यावेळी त्यांनी केला.

सोबत राहून पाठीत सुरा खुपसला जात आहे

लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. कार्यकर्त्यांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही”, असा चिमटा पटोले यांनी उद्धव ठाकरेंना काढला.

यावेळी अजित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला. “ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे”, असंही नाना पटोले म्हणाले होते.

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर बोलणार नाही – शरद पवार

पाठीत सुरा खुपसला जात असल्याच्या नाना पटोले यांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला होता.  ते म्हणाले होते की, “या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत, त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress nana patole on statement alleging maharashtra cm uddhav thackeray sgy
First published on: 12-07-2021 at 15:24 IST