हर्षद कशाळकर

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे टाटा मेमोरीअलच्या कॅन्सर रुग्णालयाची उभारणी होणार आहे. परळ आणि खारघर नंतर उभारले जाणारे हे टाटांचे तिसरे कँन्सर रुग्णालय असणार आहे. यासाठी खालापूर मधील १० हेक्टर जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
worth rupees 15 lakh Gutkha tranceport revealed during inspection on Kolhapur road
कोल्हापूर रोडवर तपासणीत १५ लाखाची गुटखा वाहतूक उघड
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

    कॅन्सर रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे परळ आणि खारघर येथील रुग्णालये अपुरी पडत आहेत. हीबाब लक्षात घेऊन आता खारघर येथे तिसरे कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दहा हेक्टर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठिकाणी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटल तर्फे सुसज्ज रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची उपचारादरम्यान राहण्याची व्यवस्थाही याच परिसरात उपलब्ध होणार आहे.

    यामुळे रायगड जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांना जिल्ह्यातच उपचार घेता येतील, कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवरील उपचारासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही यामुळे सक्षम होईल असा विश्वस पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पाला काही स्थानिकांनी विरोध करण्याची भुमिका घेतली होती. मात्र त्यांची समजूत काढण्यात आली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे रुग्णालय अतिशय महत्वाचे असून, रायगड सह मुंबई, ठाणे आणि पुण्यातील कॅन्सर रुग्णांसाठी हे रुग्णालय वरदान ठरेल असा विश्वास त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केला.