राज्यात सध्या करोनाग्रस्त ४० रुग्ण आहेत. त्यातील फक्त एकाची प्रकृती गंभीर आहे. अन्य रुग्णांची प्रकृती व्यवस्थित आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक करोना बाधित रुग्ण आढळला आहे. पुण्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा १७ वर पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रुग्णाचं निधन झालं आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. संबंधित ६४ वर्षीय व्यकी घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईतून परतल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुबईहून प्रवास केलेल्या रुग्णाचा आज सकाळी सात वाजता कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. सदर व्यक्तीची कोरोनाची चाचणी झाली होती. मात्र या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला की अन्य पूर्व आजारामुळे याची खात्री केली जात आहे”. पुढे त्यांनी सांगितलं की, “ही व्यक्ती ५ मार्चला दुबईहून आली होती. त्यांना ७ मार्चला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर श्वसनासंबंधीच्या आजाराचे उपचार सुरू होते. त्यांनंतर त्यांना कस्तुरबा मध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी औषधोपचाराला प्रतिसाद दिला. आज सकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झाला”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus only one patient codition is critical uddhav thackray dmp
First published on: 17-03-2020 at 18:31 IST