महाराष्ट्रात दिवसभरात २० हजार ४८२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या १० लाख ९७ हजार ८५६ वर पोहोचली आहे. दरम्यान राज्यात ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत रुग्णांची संख्या ३० हजार ४०९ इतकी झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.७७ टक्के इतका झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात १९ हजार ४२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यत ७ लाख ७५ हजार २७३ करोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७०.६२ टक्के इतकं झालं आहे. राज्यात सध्या २ लाख ९१ हजार ७९७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

आजपर्यंत ५४ लाख ९ हजार ६० चाचण्या करण्यात आल्या असून यामधील १० लाख ९७ हजार ८५६ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ३४ हजार १६४ जण होम क्वारंटाइन आहेत, तर ३७ हजार २२५ जण संस्थात्मक क्वारंटइन आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus 20482 new cases and 515 deaths reported in maharashtra today sgy
First published on: 15-09-2020 at 20:56 IST