रायगड जिल्ह्यात २०१४हे वर्ष भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या प्रकरणांसाठी गाजले. जिल्ह्यात शासकीय कार्यालयात लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली. यात २८ प्रकरणात ४३ जणांना अटक करण्यात आली. दाखल झालेल्या प्रकरणात महसुल विभागातील १०, पोलीस विभागातील ३, जिल्हा परिषदेतील ३, सार्वजनिक बांधकाम विभागातील २, ग्रामपंचायत २, बंदर विभागातील २, सहाय्यक धर्मदाय विभागातील १, नगरपालिका १, नगर रचना विभाग १, सहकार विभाग १ तर विजवितरण विभागातील १ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेष आहे. तर अटक करण्यात आलेल्या ४३ जणांमध्ये वर्ग १च्या ५, वर्ग २ च्या ५, वर्ग ३ च्या २०, वर्ग ४ च्या २, लोकसेवक संवर्गातील ४ तर इतर ७ खाजगी व्यक्तीचा समावेष आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे लाचखोरीच्या प्रकरणात पुरुषांबरोबरच महीलांचाही समावेष वाढत असल्याचे दिसून आले आहे. नगररचना विभाग, महसुल विभाग आणि सहकार विभागातील महीला अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या प्रकरणात या वर्षी अटक करण्यात आली आहे.
दक्षिण रायगडाच्या तुलनेत उत्तर रायगडात लाचखोरीची किड वाढली असल्याचे दिसून येत आहे. अलिबाग मध्ये ७, पेण मध्ये ८, कर्जत ४, पनवेल ३, खालापुर ३ मुरुड १ आणि माणगाव मधील १ लाचखोरीची प्रकरणे समोर आली आहे. बेहिशेबी मालमत्ता कमवल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर गन्हे दाखल करण्यात आले असून जिल्ह्यातील १८ अधिकाऱ्यांची उघड तर १० अधिकाऱ्यांची गुप्त चौकशी सध्या सुरु असल्याची माहीती रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख सुनील कलगुटकर यांनी दिली आहे. लाचखोरीच्या प्रकरणांची माहीती देण्यासाठी लोकांनी समोर यावे, आणि तक्रारी कराव्यात तक्रारी साठी १०६४ या टोल फ्री कमांकावर अथवा ०२१४१-२२२३३१या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2015 रोजी प्रकाशित
रायगडात लाचखोरीच्या २८ प्रकरणात ४३ जणांना अटक
रायगड जिल्ह्यात २०१४हे वर्ष भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या प्रकरणांसाठी गाजले. जिल्ह्यात शासकीय कार्यालयात लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली.

First published on: 02-01-2015 at 06:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corruption increases in raigad district