राज्यात आज दिवसभरात १ हजार ३९९ जण करोनामुक्त झाले असून, १ हजार १७२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५०,५८५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.५७% एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,११,०७८ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०२१६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज २० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२६,६७,२११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,११,०७८(१०.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६५,८२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १६,६५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.