भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला असून जुलैमध्ये ही लाट ओसरण्याची शक्यता आहे. दरम्यान सहा ते आठ महिन्यांनी करोनाची तिसरी लाट येऊ शकते. केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन-सदस्यांच्या समितीकडून हे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्र (SUTRA – Susceptible, Undetected, Tested (positive), Removed Approach) मॉडेलचा वापर केल्यास मे महिन्याच्या अखेर दिवसाला दीड लाख आणि जून महिन्याच्या अखेर दिवसाला २० हजार रुग्ण आढळतील असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.

“महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाण, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी आधीच शिखर गाठलं आहे,” असं समितीचे सदस्य असणारे आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं आहे. मॉडेलनुसार, तामिळनाडूत २९ मे ३१ मे दरम्यान आणि पुद्दुचेरीत १९ ते २० मे दरम्यान रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांनी अद्याप रुग्णवाढ पाहिलेला नाही. आसाममध्ये २०-२१ मे, मेघालयमध्ये ३० मे आणि त्रिपुरामध्ये २६-२७ मे रोजी रुग्णसंख्येचं शिखर गाठलं जाऊ शकतं. दरम्यान उत्तरेकडे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सध्या रुग्णवाढ दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये २४ मे आणि पंजाबमध्ये २२ मे रोजी मोठी रुग्णवाढ पहायला मिळू शकते.

मॉडेलनुसार, करोनाची तिसरी लाट सहा ते आठ महिन्यांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणामही उशिरा जाणवू शकतो. “लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असेल त्यामुळे अनेकजण तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित असतील,” अशी मााहिती अग्रवाल यांनी दिली आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत करोनाची तिसरी लाट येणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 third wave after 6 months says govt panel maharashtra peak sgy
First published on: 20-05-2021 at 08:52 IST