कोल्हापूर येथील पुणे-बंगळुरू महामार्गावर शुक्रवारी पहाटे गाडीची धडक लागून एका महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचे वडील मधुकर बाबूराव रहाणे (५४) यांचे नाव पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध ३०४ अ, २८९, ३३७ , ३३८ आणि मोटारवाहन कायद्याच्या कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील कागलला जाणाऱ्या जोड पूलाच्या रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातमध्ये मृत पावलेल्या आशाताई कांबळे (वय ६७) रस्ता ओलांडत होत्या. मात्र, रस्त्याच्या मधोमध आल्यावर त्या गोंधळल्या आणि एकाच जागी थांबून राहिल्या. नेमक्या त्याचवेळी समोरून मधुकर रहाणे यांची कार येत होती. ते सहकुटुंब कोल्हापूरमार्गे मुंबईहून तारकर्लीला चालले होते. यावेळी मधुकर राहणे कार चालवत असल्याचे समजते.

आशाताई कांबळे अचानकपणे एकाच जागी थांबल्याने मधुकर रहाणे यांचाही गोंधळ उडाला. त्यामुळे आशाताई कांबळे यांना गाडीची धडक बसली. यानंतर त्यांना येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मधुकर रहाणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध ३०४ अ, २८९, ३३७ , ३३८ आणि मोटारवाहन कायद्याच्या कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer ajinkya rahane fathers car give dash to women died in accident
First published on: 15-12-2017 at 09:23 IST