बीडमध्ये जमिनीच्या वादातून तिघांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. गुरूवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील मांगवडगाव परिसरात शेतीच्या भांडणातून पारधी समाजाच्या तीन व्यक्तींचा निर्घृण हत्या केल्याप्रकरणी येथील निंबाळकर कुटुंबातील दहा जणांसोबत १४ व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या हत्याकांडापूर्वी पारधी समाजातील व्यक्तींना पळून जाता येऊ नये म्हणून त्यांच्या मोटार सायकलीही जाळून टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहितीमिळताच घटनास्थळाला पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तात्काळ भेट दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री हल्लेखोरांनी नियोजनबद्ध हल्ला केला. तीस ते ४० जण ट्रॅक्टरने आले होते व त्यांनी पाठलाग करून तिंघावर हल्ला केला. यामध्ये बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार या तिघांचा मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news beed kej murder 14 arrest nck
First published on: 14-05-2020 at 11:48 IST