एका कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे व इतर ९ जणांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज नावाची कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे. याच कंपनीत दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर करतात.
कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकते माप देते असा उदयनराजेंचा आरोप होता. त्यामुळे दि. १८ फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घतले. उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जैन यांना तिथे मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस ठाण्यात केली. यावरून उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे उदयनराजे आणि रामराजे निंबाळकर यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अशोक सावंत, रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल अशा ९ जणांना अटक करण्यात आली आहे. उदयनराजे यांच्याबाबत पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal case file against mp udayanraje bhosale beaten satara ramraje nimbalkar
First published on: 23-03-2017 at 17:37 IST