नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डी. बी. पाटील हे म्हैसा भागात व्यापारी, उद्योजक म्हणून ओळखले जातात. २००४ मध्ये निवडणूक लढवताना पत्नीसह त्यांच्या नावावर असलेल्या स्थावर, तसेच जंगम मालमत्तेत १० वर्षांत मोठी वाढ झाली असली, तरी गेल्या आर्थिक (२०१२-१३) वर्षांत त्यांचे उत्पन्न होते, फक्त २ लाख ३२ हजार. म्हणजे महिन्याकाठी २० हजारांहून कमी!
तब्बल ५ वर्षांनंतर भाजप उमेदवार या नात्याने राजकीय पुनरागमन करणाऱ्या डी. बी. पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी दाखल करताना आपली संपत्ती, मालमत्ता स्वतंत्र शपथपत्राद्वारे उघड केली. २०१२-१३ या वर्षांत त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न जास्त (३ लाख ४२ हजार) होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी डी. बीं.कडे ५ लाख, तर सत्त्वशीला पाटील यांच्या हाती ३ लाख रुपये रोख रक्कम होती. २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविताना डी. बी. यांनी आपली संपत्ती व मालमत्तेचा तपशील शपथपत्राद्वारे जाहीर केला होता. त्यावेळी त्यांच्या हातावरील रोख रक्कम ३ लाख रुपये होती. बँका व वित्तीय संस्थांत त्यांच्या खात्यावरील शिल्लक १ लाख ६० हजार, तर रोखे, शेअर्समधील गुंतवणूक अडीच लाखांच्या आसपास होती. त्यांच्या नावावर स्कॉर्पिओ, मारुती गाडी आणि पावणेदोन लाख रुपयांचे सोने-चांदी होते. त्यावेळी त्यांच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शेतजमिनीचे बाजारमूल्य ३१ लाख ६० हजार, तर निवासी व व्यापारी इमारतीचे बाजारमूल्य २९ लाख २५ हजार होते. म्हणजे त्यांची संपूर्ण संपत्ती-मालमत्ता एक कोटीच्या आसपास होती. खासदार होण्यापूर्वी डी. बी. जवळपास ९ वर्षे आमदार होते, तरीही त्यांच्या नावावर मुंबई-पुण्यात सदनिका नव्हती!
डी. बी. पाटील २००४ ते २००९ या काळात खासदार होते. या दरम्यान त्यांच्या मालमत्तेत झालेली लक्षणीय वाढ म्हणजे सिकंदराबाद येथे घेतलेली एक हजार चौरस फुटांची सदनिका. तिचे आजचे बाजारमूल्य २५ लाख आहे. त्यांची शेतजमीन व निवासी-व्यापारी इमारतींचे मूल्य १ कोटी ७२ लाख ५० हजार इतके आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे अशी मालमत्ता ९५ लाख ३० हजारांची आहे.
२००९ च्या निवडणुकीतून अचानक माघार घेत डी. बी. माजी खासदार व आमदार या नात्याने एकीकडे ‘पेन्शनर’ झाले, तर दुसरीकडे त्यांनी म्हैसा भागातील व्यवसायात बरीच वृद्धी केली, असे दिसून येते.
माजी आमदार व खासदार या नात्याने त्यांना दरमहा ६० हजार रुपये निवृत्तिवेतन मिळत असावे, असा अंदाज आहे. त्यानुसार असलेले त्यांचे वार्षिक उत्पन्न आणि २०१२-१३ या वर्षांचे आयकर विवरण (रिटर्न) भरताना त्यांनी दाखविलेले उत्पन्न यात विसंगती दिसते. या संदर्भात एका सनदी लेखापालाकडे विचारणा केली असता, आयकर अधिनियमातील कलम १०(१७) अनुसार अशा निवृत्तिवेतनाला कुठल्याही प्रकारची सवलत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D b patil monthly income less 0 thousand
First published on: 25-03-2014 at 05:46 IST