राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने औरंगाबादमधून सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली असून तिघांच्या घरातून काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी शरद कळसकर (वय २९) आणि सचिन अंदुरे या दोघांना अटक केली होती. राज्याच्या एटीएसने ही कारवाई केली होती. सचिन अंदुरेची कसून चौकशी केल्यानंतर मंगळवारी पहाटे पोलिसांच्या पथकाने औरंगाबादमध्ये सचिन अंदुरेच्या तीन मित्रांच्या घराची झाडाझडती घेतली. यातील एकाच्या घरात पोलिसांना हत्यारे सापडली, असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. तर अन्य दोघांच्या घरातून कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचे साहित्य जप्त करण्यात आले. औरंगाबादमधील पैठण रोड येथे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dabholkar murder case ats detained sachin andures three co aide from aurangabad
First published on: 21-08-2018 at 10:22 IST