ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल असे सांगून पैसे देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा डाव डहाणू येथील स्थानिक ग्रामस्थांनी उधळून लावला.

डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे शुक्रवारी दुपारी घरात एकटी असलेल्या वयस्कर आदीवासी महिलेला पैशाचे आमिष दाखवत जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्विकारणायास भाग पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या चार मिशनरीना डहाणू पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

प्रथा साजर्‍या करण्यावरून वारंवार वाद होण्याचे प्रकार –

पालघर जिल्ह्यातील डहाणू , तलासरी ,जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदीवासी बहुल तालुक्यात धर्मातरणाचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या भागातील गरीब आशिक्षीत आदीवासींना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत तसेच विविध आमिषे दाखवत धर्मांतरण केले जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी हिंदू, आदीवासी आणि धर्मातरण केलेले ख्रिश्चन आदीवासी यांच्यात सण-उत्सव आणि इतर प्रथा साजर्‍या करण्यावरून वारंवार वाद निर्माण होण्याचे प्रकार घडत आहेत.

महिलेची पोलिसात तक्रार –

शुक्रवारी दुपारी डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे चार ख्रिश्चन मिशनरींनी एका आदीवासी महीलेच्या घरात शिरून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास आपले सर्व दुखणे बरे होईल. तसेच पैसे देण्याचे आमिष दाखवत तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करू नका, असे सांगून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याची तक्रार या महीलेने डहाणू पोलिसांत केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावात ख्रिश्चन धर्मप्रसारक आल्याचे कळताच स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमून त्यांनी मिशनरीना फैलावर घेत त्यांचावर प्रश्नांचा भडीमार केला. महीलेच्या तक्रारीवरून डहाणू पोलिसांनी क्लेमेंट डी. बैला , मरीयामा टी फिलीप्स, परमजीत उर्फ पिंकी शर्मा कौर आणि परशुराम धर्मा धिंगाडा या चार मिशनरीना ताब्यात घेऊन भा . दं . वि . कलम १५३ , २९५ , ४४८ , ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करून अटक केली आहे.