प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमात कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी याची दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले. याबाबत विचारलं असता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली. “मला महिला आयोगाबाबत माहिती नव्हतं, मात्र त्यांनी दखल घेतलेलं पाहून बरं वाटलं,” असं मत गौतमीने व्यक्त केलं. ती नाशिकमध्ये एका नृत्य कार्यक्रमासाठी आली असताना माध्यमांशी बोलत होती.

गौतमी पाटील म्हणाली, “महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. ते पाहून बरं वाटलं. मला महिला आयोगाबाबत माहिती नव्हतं, मी माझ्या वेगळ्याच दुनियेत होते. नंतर मला कळलं की, रुपाली चाकणकर यांनीही या प्रकरणाची दखल घेतली. त्या सोबत आहे हे पाहून मला खूप छान वाटलं. त्यांनी ताबडतोब कारवाई करा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा असं सांगितलं. त्यामुळे बरं वाटलं.”

“मला नेहमीच प्रेक्षकांचं प्रेम मिळत आलं आहे. अजून जास्त प्रेम मिळतंय त्यामुळे आणखी छान वाटतंय. माझी बोलण्याची मनस्थिती नाहीये, तरीही मी तुमच्यासमोर आली आहे. लोक माझ्यासोबत आहेत. या गोष्टीचा खूप अभिमान आहे. आपल्याला लोकांची साथ आहे, यामुळे खूप छान वाटतंय,” अशी भावना गौतमी पाटीलने व्यक्त केली.

हेही वाचा : VIDEO: गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “एखाद्या महिलेचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याबाबत विचारलं असता गौतमी पाटील म्हणाली, “त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे. मी यावर काहीही बोलू शकत नाही. माझी पोलिसांकडे काहीही मागणी नाही. माझं पोलिसांशी जे बोलणं चालू आहे, ते चालू आहे. मी त्या बाबतीत काहीही बोलू शकत नाही.”