तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात एका महिलेचा निर्घृण खून झाल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. मृत महिलेची दीड वर्षांची चिमुकली मृतदेहाजवळ रात्रभर रडत असल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले. तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.
तामलवाडी शिवारातील गंजेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मध्यरात्रीच्या सुमारास २५वर्षीय महिलेचा अनोळखी व्यक्तींनी दगडाने ठेचून खून केला. महिलेचा मृतदेह हुजूर पटेल या शेतकऱ्याच्या शेतात फेकून देण्यात आला. सकाळी साडेसात वाजता गंजेवाडी रस्त्याने जात असताना अभियंता काळे यास मृत महिलेजवळ लहान मुलगी रडत असल्याचे आढळून आले. जवळ जाऊन पाहिले असता महिलेचा खून झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काळे यांनी तामलवाडी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मिर्झा बेग, उपनिरीक्षक सुरेश िशदे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
महिलेचा चेहरा दगडाने ठेचण्यात आल्याने तिची ओळख पटली नाही. तिच्या अंगात पिवळी-लाल साडी, हातावर लव्ह व इंग्रजीतील ‘के’ अक्षर त्यात गोंदलेले आढळले. मृत महिलेच्या दीड वर्षांच्या मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सावरगाव आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. तामलवाडी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daughter cried near mothers in night
First published on: 24-07-2015 at 01:20 IST