सांगली : यायला लागतयं असा आग्रह आर आर आबांच्या कार्यकर्त्यांनी धरताच उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष करण्याच्या महत्वाच्या निर्णयात सक्रिय मदत केली. तरीही तुम्ही माझी काय राखली? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावमध्ये आर आर आबा गटाच्या कार्यकर्त्यांचा आदर सत्कार स्वीकारण्यास आणि आबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यास नकार दिला.

हेही वाचा >>> राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल कधी लागणार? राहुल नार्वेकरांचं दोन शब्दांत उत्तर, म्हणाले…

sanjay raut replied to amit shah
“आम्ही तुमच्यासारखे ‘जिना फॅन्स क्लब’चे सदस्य…”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर!
pankaja munde on pooja khedkar ias
“कालच असा काय साक्षात्कार झाला की…”, IAS पूजा खेडकर प्रकरणाशी नाव जोडल्याने पंकजा मुंडे संतप्त; म्हणाल्या…
ashok chavan keep bjp away from program on birth anniversary of shankarao chavan
शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; भाजपला दूर ठेवण्याची दक्षता!
Case, Special Public Prosecutor,
माजी आमदाराच्या तक्रारीवरून विशेष सरकारी अभियोक्त्याविरोधात गुन्हा, १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
Vasant More join Shiv Sena Uddhav Thackeray
‘इतर पक्षात सन्मान नाही’, वसंत मोरेंचा पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरेंची मनसेवर टीका
Hathras Satsang Stampede anti superstition law demanded by Mallikarjun Kharge in Rajya Sabha Jadutona virodhi kayada
हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत अंधश्रद्धाविरोधी कायद्याची मागणी; काय आहे महाराष्ट्रात लागू असलेला हा कायदा?
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
BJP, BJP s kedar sathe, Ramdas Kadam, shivsena, BJP s kedar sathe Warns Ramdas Kadam Over Offensive Remarks, Dapoli Constituency, Guhagar Constituencies, ratnagiri, maharashtra assembly 2024, sattakaran article,
रामदास कदमांच्या विरोधात भाजपने दंड थोपटले

सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगली जिल्ह्याचा धावता दौरा केला. विटा येथे स्व.आमदार अनिल बाबर यांच्या घरी सांत्वनपर भेट देउन सांगलीला परतत असताना ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. अगदी तासगावच्या वेशीवर खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांनीही स्वागत केले.यानंतर तासगाव बाजार समितीजवळ आल्यानंतर पवार यांची मोटार आरआर आबा पाटील गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विश्‍वास पाटील, अमोल शिंदे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादांची मोटार अडवून आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करा आणि आमचा सत्कार स्वीकारा असा आग्रह करीत होते.यावेळी मी आताच सांत्वन भेट केली असल्याने अशावेळी सत्कार नको असे सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कार्यकर्त्यांनी यायलाच लागतय असा आग्रह धरताच दादांनी खडसावून सांगितले, आबांना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रदेशाध्यक्ष करण्यासारख्या महत्वाच्या निर्णयात माझा सहभाग महत्वाचा होता.

हेही वाचा >>> कुख्यात गुंडांचे मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो, गुन्हेगारांचे मंत्रालयात रील्स, विरोधकांच्या टीकेनंतर सरकारची पहिली प्रतिक्रिया

माझ्यासोबत याल म्हणून वाट पाहिली, मात्र आला नाहीत, तुम्ही माझी काय राखली अशा शब्दात आदर सत्कार स्वीकारण्यास आणि आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यास ठाम नकार देत पुढे रवाना झाले. यानंतर अवघ्या शंभर मीटर अंतरावर दादा गटाचे कार्यकर्तै आणि नव्याने नियुक्त केलेले जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्याठिकाणी मात्र अजितदादांनी थांबून त्यांचा आदरसत्कार स्वीकारत पुढे सांगलीच्या दिशेने मार्गक्रमण केले.