सातारा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण तालुक्यातील निंभोरे हद्दीत गव्हाच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला असावा, याचा वनविभाग तपास करत आहेत. गेेल्या महिनाभरात जिल्ह्यात आढळलेला चौथा मृत बिबट्या असल्याने खळबळ उडाली आहे.

निंभोरे गावालगत एका शेतात ग्रामस्थांना हा बिबट्या मृतावस्थेत दिसला. त्यांनी ही बाब फलटण वनविभागाला कळवली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे याचा तपास करीत आहेत.फलटण तालुक्यात निंबलक, मुंजवडी, गिरवी या परिसरात अनेकदा बिबट्या दिसला होता. वनविभागाच्या कॅमेऱ्यात देखील बिबट्या कैद झाला होता. मात्र, पुणे-पंढरपूरसारख्या रहदारीच्या परिसरात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्याचे वास्तव्य या भागात असेल तर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वन विभागाकडून सांगण्यात आले. गेेल्या महिनाभरात कराडजवळ ३ बिबटे मृत आढळले होते. यानंतर लगोलग फलटण परिसरात चौथा मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्यांचे हे मृत्यू नक्की कशामुळे होत आहेत याचा वनविभाग तपास करत आहेत.