‘उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्यांबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. त्यामुळे आम्ही प्रत्युत्तर देणार नाही’ असे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे. गोव्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केसरकरांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यावेळेस केरसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जवळचा आहे असे वाटत असेल, पण हा भ्रम नक्की दूर होईल. जोपर्यंत आम्हाला एकनाथ शिंदे सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही प्रत्युत्तर देणार नाही, असे केसकरांनी स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदेवर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर
एकनाथ शिंदेविरोधात करण्यात आलेली कारवाई शिवसेनेला शोभणारी नाही. याबाबत शिवसेनेला रीतसर उत्तर पाठवण्यात येईल, असेही केसकर म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याबाबतचं पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. त्यांनी ऐकलं नाही तर पुढील भूमिका घेऊ, असेही केसकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar on shiv sena chief uddhav thackeray
First published on: 02-07-2022 at 16:26 IST