दिल्ली पोलिसांच्या पथकाने आज सुरक्षाव्यवस्था डावलून, तसेच व्हीआयपी द्वारातून एका आरोपीसह जाऊन शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले असल्याचा दावा सूत्रांनी केला .
याबाबत असे समजते की, तो आरोपी नेमका कोण होता व कोणत्या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी त्याला शिर्डी येथे आणले होते याची खातरजमा होऊ शकली नाही. दिल्ली पोलिसांचे तीन सदस्यांचे पथक एका महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली शिर्डीला आले. त्यांनी आरोपीसह चार जणांसाठी चारशे रूपयांप्रमाणे पैसे भरून सकाळी आठ वाजता  व्हीआयपी पास घेतले होते.
प्रवेशद्वारावर आरोपीला दर्शनास नेण्याबाबत हरकत घेतली. मात्र पोलिसांनी त्याच्या हातकडय़ा काढल्या व सुरक्षा अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले, असे सूत्रांनी सांगितले.