लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेर उपविभागातील २० जणांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव करण्यात आले आहेत. त्यापैकी आठ जणांची सुनावणी प्रांताधिका-यांसमोर झाली असून उर्वरित बारा जणांच्या सुनावणीनंतर येत्या दोन-तीन दिवसांत हे आदेश निघण्याची शक्यता आहे.
राजकीय पक्ष निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्यात गुंतले असतानाच प्रशासनाने सामाजिक शांतता बिघडवून निवडणुकीच्या कामात व्यत्यय आणण्याची शक्यता असलेल्या वीस जणांवर हद्दपारीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडून सामाजिक शांततेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक स्वाती भोर यांनी यासंबंधीचा प्रस्ताव प्रांताधिकारी संदीप निचित यांच्याकडे पाठवल्यानंतर त्यांनी या सर्वावर हद्दपारीच्या कारवाईचा निर्णय घेतला आहे.
बारा जणांचा उपअधीक्षक कार्यालयाचा प्राथमिक चौकशी अहवाल अद्याप प्रांताधिका-यांकडे सादर झालेला नसल्याने ही सुनावणी अपूर्ण राहिली आहे. दरम्यान ज्या आठ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते त्यांची सुनावणी प्रांताधिकारी निचित यांच्यासमोर शुक्रवारी झाली. उर्वरित लोकांच्या सुनावणीनंतर संबंधितांना किती दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करायचे यासंबधीचा निर्णय प्रांताधिकारी घेणार आहेत. हद्दपार होणा-यांत काही राजकीय पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सुनावणी पूर्ण झालेल्यांमध्ये संदीप तुकाराम घुले (जांबूत, संगमनेर), गुलाब गंगाराम गोडे (कोकणेवाडी, अकोले), जुबेरखान निसारखान पठाण (नायकवाडपुरा, संगमनेर), म्हातारबा, सुधाकर व मधुकर मल्हारी हांडे (तिघेही मन्याळे, अकोले), संदीप व प्रदीप भाऊसाहेब घुगे (दोघेही मालुंजे, संगमनेर) यांचा समावेश आहे. तर सुदर्शन दत्तात्रय इटप, शाहनवाझ ऊर्फ अंडय़ा इमाम शेख, लखन दीपक जेधे, कल्पेश सोमनाथ पोगूल, संतोष रामचंद्र पवार, अशरफ समशेरअली जहागीरदार, शंकर भागप्पा इटप (सर्व संगमनेर), बाळू रामभाऊ केदार (वरुडीफाटा, संगमनेर), काशिनाथ रामकृष्ण लंके (सारोळेपठार), दीपक दत्तात्रय चिंतामणी (नेवासे), राहुल भास्कर भिंगारदिवे (अशोकनगर, श्रीरामपूर) व रघुनाथ ऊर्फ अण्णा बाबासाहेब शिंदे (अशोकनगर, श्रीरामपूर) यांची सुनावणी प्रलंबित आहे.
संगमनेरला वीस जणांवर हद्दपारीच्या कारवाईची शक्यता
वार्ताहर, संगमनेर